7,171
Religion To Responsibility
https://www.youtube.com/channel/UCPwG1_g46KtWb9Rcm_bwG8Q
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.
अत्यंत नम्र आवाहन - आई तुळजाभवानीच्या चरणी सेवा करणाऱ्या कुटुंबाला आपल्या मदतीची गरज!
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आई तुळजाभवानी या माऊलीच्या चरणी, तिच्या गाभाऱ्यात रात्रंदिवस मनोभावे सेवा करणाऱ्या एका सेवेकरी पुजारी कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे.![]()
मंदिरात येणाऱ्या लाखो भक्तांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणाऱ्या शेळके कुटुंबातील अवघ्या ५ वर्षांचा निष्पाप लहानगा 'श्रेनीक' सध्या हॉस्पिटलमध्ये एका गंभीर आणि मोठ्या आजाराशी झुंज देत आहे. तो निष्पाप जीव रोज मृत्यूशी दोन हात करत 'जगण्यासाठी' धडपडत आहे.
शेळके कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत हलकीची आहे. श्रेनीकच्या संपूर्ण उपचारासाठी तब्बल ४०,००,००० रुपये (चाळीस लाख रुपये) इतका प्रचंड खर्च अपेक्षित आहे. एका सर्वसामान्य सेवेकरी कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे म्हणजे आभाळ पेलण्यासारखे कठीण काम आहे..
त्यामुळे सर्वांना विनंती सर्वांनी जमेल तशी मदत करावी..
![]()
सर्व जनतेला विनंती:-
लाखो भक्त आई तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात, नवस बोलतात. आज त्याच आईच्या दरबारातील एका बालकाला वाचवण्यासाठी आपल्याला 'भक्त' म्हणून नाही, तर एक 'माणूस' म्हणून पुढे यायचे आहे..![]()
तुम्ही दिलेली १०, ५०, १०० किंवा ५०० रुपयांची छोटीशी मदत सुद्धा श्रेनीकला नवीन आयुष्य देऊ शकते..![]()
मदत करताना महत्त्वाची खात्री करा:-
खाली दिलेल्या स्कॅनरवर किंवा खात्यावर मदत पाठवताना नाव: Chetan D Shelke (चेतन डी. शेळके) आणि त्यांचा मोबाईल नंबर 96040 42624 याची व्यवस्थित खात्री करूनच आपली मदत जमा करावी.![]()
एक हात मदतीचा, एका निष्पाप जीवाचा प्राण वाचवू शकतो!
हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि गृपवर शेअर करून श्रेनीकसाठी मदतीचा ओघ सुरू ठेवण्यास मदत करा.![]()
आई तुळजाभवानी श्रेनीकला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो, हीच चरणी प्रार्थना! जय#highlight️#tuljapurn#tuljabhavanitemple##helpotherst#CMOMaharashtrahavanitemple
#helpothers
#CMOMaharashtra
माणुसकीचा उजेड - एका कोमेजणाऱ्या कळीला मिळालेलं नवजीवन..![]()
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट... गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर एक ८-९ वर्षांची चिमुरडी लोकांसमोर हात पसरून भीक मागत होती. तिचे ते केविलवाणे डोळे आणि अकाली कोमेजलेलं बालपण पाहून रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशनची टीमचे रमुस्तफा सय्यद यांचे पाय क्षणभर थबकले. त्यांनी कोणताही विचार न करता त्या माऊलीला काळजाच्या जवळ केलं, तिला मायेने कुरवाळलं आणि नवीन कपडे देऊन तिच्या चेहऱ्यावर एक निखळ समाधान आणलं. पण, ही तर फक्त एका मोठ्या संघर्षाची सुरुवात होती. जेव्हा या टीमने तिची अधिक माहिती काढण्यास सुरुवात केली, तेव्हा पुढे जे सत्य समोर आलं, ते मानवी कल्पनेच्या आणि संवेदनशीलतेच्या पलीकडचं, मन सुन्न करणारं होतं.![]()
'मुलगी जन्माला आली की पुढच्या काळातल्या आधाराची सोय होते' ही अत्यंत भीषण आणि स्वार्थी मानसिकता आजही समाजाच्या काही अंधाऱ्या कोपऱ्यात पाय घट्ट रोवून बसलेली आहे, याची दाहक जाणीव झाली. त्या निष्पाप मुलीची आई एका बदनाम वस्तीत (रेड लाईट एरिया) राहत होती. स्वतःचं दारूचं व्यसन भागवण्यासाठी ती स्वतःच्याच पोटच्या गोळ्याला या नरकयातनेत ढकलत होती, तिला भीक मागायला लावत होती. व्यसनाच्या आहारी जाऊन तिथेच पडून राहणाऱ्या आईच्या सानिध्यात या चिमुरडीचं भविष्य काय असणार? हा विचार केला तरी अंगावर काटा येतो. ज्या वयात हातामध्ये पाटी-पेन्सिल असायला हवी, त्या वयात तिच्या वाट्याला हे शोषण आलं होतं.![]()
"ये कहाँ की रीत है जागे कोई सोए कोई,
रात सब की है तो सब को नींद आनी चाहिए..."![]()
रात्र सर्वांची समान असते, पण समाजातली ही दरी किती भयानक आहे? कुणी सुखाची झोप घेतंय तर कुणी याच रात्रीच्या गर्द अंधारात कामाला, शोषणाला जुंपलं जातंय. बालपण तर प्रत्येकालाच लाभतं, पण काहींचं बालपण आई-बाबांच्या सुरक्षित कुशीत आनंदात जातं, तर काहींच्या वाट्याला जन्मापासूनच वेदनांचा विळखा येतो. ज्या कळ्या उमलण्यापूर्वीच अकाली खुडल्या जातात, त्यांच्या दृष्टीने हे जग तिथेच मरून गेलेलं असतं. मग अशा मुलांच्या लेखी नंतर समाज, नैतिकता, कायदा आणि तत्ववाद हे सगळं भोंगळ ठरतं. जेव्हा ही लहान मुलं व्यवस्थे बळी पडतात, तेव्हा आपली व्यवस्था, आपला देश आणि आपला समाज सारं चराचर बधिर होऊन निद्रिस्त झालेलं असतं, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.![]()
वास्तविक पाहता, या अन्यायाविरुद्ध लढण्याची, अशा मुलांना आधार देण्याची जबाबदारी स्वतःला 'माणूस' म्हणवणाऱ्या प्रत्येकाची आहे. पण दुर्दैवाने कोणी पुढाकार घेत नाही आणि सरकारी प्रशासनही अशा संवेदनशील बाबतीत अनेकदा मंद गतीने चालते. अशा कठीण परिस्थितीत, सगळ्या कायदेशीर आणि रीतसर प्रक्रिया पूर्ण करून एका जिवाला जीवनदान देण्याचं पवित्र कार्य राहुल पाटील, मुस्तफा सय्यद आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करून दाखवलं यामध्ये दत्तात्रय शिंदे आणि अमित सूर्यवंशी (मला) हा अनुभव जवळून अनुभवायला मिळाला. या अत्यंत जटील कार्यात त्यांना 'बाल विकास समिती' (CWC) आणि 'चाईल्ड लाईन' (Childline) च्या सदस्यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.![]()
आज हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येतोय की, या संपूर्ण मित्रपरिवाराच्या आणि बालकल्याण विभागाच्या संयुक्त, अहोरात्र प्रयत्नांमुळे त्या मुलीला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला आहे. एका सुरक्षित आणि चांगल्या होस्टेलमध्ये (वसतिगृहात) तिच्या राहण्याची उत्तम व्यवस्था झाली आहे. ज्या ठिकाणी कधीकाळी अंधार आणि भीती होती, तिथे आता शिक्षणाचा प्रकाश पसरणार आहे. त्या घाण अवस्थेतून बाहेर पडून आता या चिमुरडीला कायमचा सुरक्षित निवारा मिळाला असून, तिचा आजचा लोभसवाणा आनंद हाच या टीमच्या कष्टाचं सर्वात मोठं फळ आहे. हा केवळ एक बचाव नाही, तर एका कोमेजणाऱ्या कळीला सुखात उमलण्यासाठी दिलेली माणुसकीची संजीवनी आहे!![]()
(टीप: या घटनेतील गांभीर्य आणि गोपनीयता राखण्यासाठी, तसेच कायदेशीर परमिशन नसल्यामुळे फोटो फ्रेममधील इतर फोटो अंधुक (ब्लर) करण्यात आले आहेत व एक फोटो AI च्या सहाय्याने प्रतीकात्मक स्वरूपात दर्शवला आहे.)![]()
- अमित सूर्यवंशी ✍🏻
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.
नमस्कार हों आमदार साहेब, 🙏
जबाबदारी राज्य सरकारची आहे, तशीच ती जबाबदारी तुमचीदेखील आहे. कारण आपण लातूर शहराचे लोकप्रतिनिधी आणि आमदार आहात. त्यामुळे या विषयात आपण पुढाकार घेऊन.
ज्यांनी तुमच्या नावाचं कुंकू लावलेलं नाही, त्यांच्याकडेही कृपया लक्ष द्या. कारण मदतीची गरज पक्ष, जात किंवा विचार पाहून येत नाही; ती माणूस म्हणून प्रत्येकाला असते..
आम्ही नागरिकांना 108 ॲम्ब्युलन्सवर फोन करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांना तिथून कोणतीही मदत मिळाली नाही. यापूर्वीही मी एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली होती. त्या ऑडिओमध्ये 108 सेवेमधील एका महिला डॉक्टरांना अशीच अडचण सांगण्यात आली होती. बेवारस किंवा निराधार रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास येणाऱ्या अडचणींबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती.
त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. मी आणि आमच्या टीमने त्या महिलेची पाहणी केली. ती महिला अत्यंत गंभीर अवस्थेत होती. तिच्या दोन्ही हातांना आणि डोळ्यांभोवती मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या. तिची परिस्थिती पाहून आम्ही तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.![]()
यानंतर आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता उदय मोहिते सर यांच्याशी संपर्क साधला आणि त्या महिलेला तात्काळ दाखल करून घेण्याची विनंती केली. सरांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य केले आणि त्या महिलेला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमदार साहेबांना नम्र विनंती आहे की, 108 ॲम्ब्युलन्स सेवा, सिव्हिल सर्जन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पोलीस विभाग यांच्यामध्ये बेवारस, निराधार व मनोरुग्ण व्यक्तींच्या संदर्भात अनेकदा समन्वयाचा अभाव आणि गैरसमज निर्माण होताना दिसतात. त्यामुळे या सर्व संबंधित विभागांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी.![]()
या बैठकीमध्ये आम्हालाही सहभागी करून घ्यावे, जेणेकरून प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी मांडता येतील आणि सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय निर्माण होऊन अशा गरजू व्यक्तींना वेळेत मदत मिळू शकेल. हीच आपल्याकडे नम्र विनंती आहे.
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.
सदर मनोरुग्ण व्यक्तीची विशेष बाब म्हणजे तो हातात काच घेऊन फिरत असे व रस्त्याने जाणाऱ्या महिला व मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करत असे. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी व फोन येत होते. अखेर आज संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे रेस्क्यू करून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली.![]()
सामाजिक सुरक्षितता आणि निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”![]()
— Religion to Responsibility Foundation 🙏
#highlight
Religion To Responsibility
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.
#highlightseveryone
#religiontoresponsibility![]()
"आपण नेहमीच महान गोष्टी करू शकत नाही, पण महान उदात्त हेतूने छोट्या-छोट्या गोष्टी नक्कीच करू शकतो."
This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.This content isn't available right now
When this happens, it's usually because the owner only shared it with a small group of people, changed who can see it or it's been deleted.
